कर्नाळा हा रेगड जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची १४४० फूट (४३९ मी ) आहे.
इतिहास
कर्नाळा हा किल्ला साधारण १२४८-१३१८ दरम्यान देवगिरीच्या यादवांनी बांधला. १५४० मध्ये निजामशहाने किल्ला ताब्यात घेतला. १५४० च्या आधी किल्ला गुजरात सलतनतच्या ताब्यात होता. निजामशहाने किल्ला जिंकल्यानंतर गुजराती सुलतानांनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली. पोर्तुगीजांनी सैन्याच्या बळावर किल्ला जिंकला. १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला. त्यांच्या निधनानंतर औरंगजेबाने किल्ला काबीज केला. १७४० मध्ये पेशव्यांनी किल्ला घेतला. नंतर १८१८ मध्ये ब्रिटिशांनी किल्ला काबीज केला.
वैशिष्ठ्ये
कर्नाळा किल्ल्याच्या टोकावरून प्रबळगड, राजमाची, द्रोणागिरी, चंदेरी किल्ला हि सर्व ठिकाणे दिसतात.
कर्नाळा गडावरील शीलालेख दोन पद्धतीचे आहेत- मराठी व पर्शियन