तोरणा हा किल्ला प्रचंडगड म्हणूनही ओळखला जातो. तोरणा हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वसलेला आहे. किल्ल्याची समुद्रासपाटीपासुनाची उंची ४६०३ फुट (१४०३ मी.) इतकी आहे.
इतिहास
इतिहासात तोरणा ह्या किल्ल्याला फार महत्व आहे कारण शिवाजी महाराजांनी काबीज केलेला हा पहिला किल्ला होता. त्यावेळी महाराज फक्त १६ वर्षांचे होते. असे मानले जाते कि तोरणा किल्ला १३व्या शतकात शैवा पंथांच्या (शिवाचे भक्त ) लोकांनी बांधला.१८व्या शतकात शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी ह्यांच्या हत्येनंतर तोरणा किल्ला मुघलांनी मिळवला. औरंगजेबाने तोरणा गडाला 'फुतुलगैब' हे नाव दिले. १७७६ च्या पुरंदरच्या तहानंतर हा किल्ला पुन्हा मराठा साम्राज्यात पेशव्यांकडे आला.
वैशिष्ठ्ये
तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे.
तोरणा गडाच्या प्रवेशाजवळ तोर्णाई देवीचे मंदिर आहे. म्हणूनच ह्या किल्ल्याचे नाव 'तोरणा' असे आहे.
तोरणा गडावर कोठी दरवाजा, बिनी दरवाजा, हनुमान बुरुज, झुंजार माची, बुधला माची हि काही पाहण्याजोगी ठिकाणे आहेत.