तीने इंग्लिश स्पिकींगचा कोर्स पूर्ण केला आणि मला म्हणाली कोणताही प्रश्न विचार मी तो मराठीत ट्रांन्सलेट करून सांगते
मी म्हटल SHAREit ला मराठीत काय म्हणतात ?
ती म्हणाली
वाघ जेवतोय.....🍲
😂😂😂😂😂😂😂
३ मराठी बायका भेळपुरीच्या गाडीवर जातात. पहिली : मला चाट. दुसरी : मला रगडा. तिसरी : मला आधी चाट, नंतर रगडा.
राजूला कुत्रा घेऊन फिरताना पाहून मनूने विचारले, 'तुझा कुत्रा चावतो का?' राजूला म्हणाला, 'छे! अजिबात नाही.' मनूने कुत्र्याशी खेळण्याचा प्रयत्न केला. कुत्र्याने त्याचा कचकचीत चावा घेतला. 'ओय ओय' करीत मून म्हणाला, 'तू काय म्हणालास तुझा कुत्रा चावत नाही!' राजू उत्तरला, 'पण, हा माझा कुत्रा नाही!
एकदा एका शाळेंत डेप्युटी शाळा तपासायला आले. एका वर्गांत त्यांनी फळ्यावर 'NATURE' अशी अक्षरे लिहिली आणि एका मुलाला विचारले "हा काय शब्द" आहे?
क्षणाचाही विलंब न लावता मुलगा म्हणाला " नटुरे". त्यानंतर एक एक करून सर्व मुलांना तोच प्रश्न विचारला. सर्व मुलांनी तेच सांगितले "नटुरे".
डेप्युटी संतापले. शिक्षकाला म्हणाले, "हा काय प्रकार आहे?" शिक्षक उत्तरले "पोरं अजून 'मटुरे' (mature ) झालेली नाहीत. नंतर सुधारतील."
डेप्युटी वैतागून सर्वांना घेवून हेड- मास्तरांकडे गेले व त्यांना झालेला किस्सा सांगितला. त्यावर शांतपणे हेडमास्तर म्हणाले, "जाऊ द्या हो साहेब !!! या गोष्टीचा त्यांच्या 'फुटुरे' (future ) वर कांहीच परिणाम होणार नाही".
पहिला मुलगा : माझे बाबा एवढे उंच आहेत कि हात वर करून छताला लावतात दुसरा मुलगा: माझे बाबा तर एवढे उंच आहेत कि हात वर करून विमानाला लावतात तिसरा मुलगा : माझे बाबा पण खूप उंच आहेत पण ते असले चाळे करत नाहीत..
संता : काल मी माझ्या बायको ला driver बरोबर सिनेमाला जाताना पाहिलं
बंता : अरे मग तू पण तिच्या मागोमाग जायचास ना सिनेमाला, म्हणजे काय ते तुला कळल असतं... ... संता : अरे बर झालो नाही गेलो ते, तो सिनेमा मी आधी पहिला होता..
संता : अरे यार बंते, हा sent message काय प्रकार आहे ? बंता : काढलीस ना लाज, एवढं पण माहीत नाही.. sent message म्हणजे perfume वाला message...