तिकोना किल्ल्यास वितंडगड असेही म्हणतात. हा किल्ला महाराष्ट्रातील कामशेत(पुण्याहून ६० किमी) येथे वसला आहे. हा एक डोंगरी किल्ला असून ह्याचा आकार त्रिकोणी आहे. समुद्रसपाटीपासून ह्या किल्ल्याची उंची ३५०० फूट आहे.
इतिहास
१५८५ मध्ये मलिक अहमद निजामशहा १ ह्याने तिकोना किल्ला ताब्यात घेतला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी संपूर्ण कोंकण मिळवला. तेव्हाच शिवाजी महाराजांनी तिकोना, कर्नाळा, लोहगड, माहुली, सोनगड ताब्यात घेतले. १६६० मध्ये धमाले कुटुंबाकडे तिकोना किल्ल्याची जबाबदारी दिली गेली. कुबाद्खानाने जेव्हा हलालखानच्या मदतीने किल्ल्याच्या भागात हल्ला केला तेव्हा त्याला हा किल्ला देण्यात आला. १८ जून ला किल्ला कुबाद्खानाच्या ताब्यात गेला. परंतु मराठ्यांनी नंतर तो परत मिळवला.
वैशिष्ठ्ये
तिकोना किल्ल्यावर प्रसिद्ध असे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे.