लोहगड हा महाराष्ट्रातील लोणावळा जवळील एक डोंगरी किल्ला आहे. लोहगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची ३३८९ फुट (१०३३ मी.) इतकी आहे.
इतिहास
लोहगड हा किल्ला जवळ जवळ संपूर्ण काळ मराठा साम्राज्यात होता. केवळ काही पाच वर्ष तो मुघलांच्या ताब्यात होता. लोहगडला मोठा इतिहास आहे. या किल्ल्यावर बऱ्याच राजघराण्यांनी वास्तव्य केले आहे. - सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव, बहामी, निजाम, मुघल, मराठा. शिवाजी महाराजांनी १६४८ मध्ये हा किल्ला काबीज केला व १६६५ मध्ये नाईलाजाने पुरंदर करारामुळे हा किल्ला मुघलांना द्यावा लागला. शिवाजी महाराजांनी १६७० मध्ये हा किल्ला परत मिळवला. सुरतची लुट ठेवण्यासाठी लोहगड किल्ल्याचा उपयोग केला. नंतर पेशव्यांच्या काळात नाना फडणवीस लोहगडात काही काळ राहिले.
वैशिष्ठ्ये
लोहगडावर गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा हे किल्ल्याचे प्रमुख द्वार आहेत.
लोहगड किल्ल्याच्या जवळच कारला लेणी, भाजा लेणी, लोणावळा हि पर्यटन स्थळे आहेत.